अस माझ प्रेम असाव ...
जगाच्या दूर , एका प्रेम नगरीत , आपल छोट स एक घर असाव , अस माझ प्रेम असाव ... तू माझी रोज वाट पहावी , आणि मी हळूच येवून , तुला मिठीत घ्याव , अस माझ प्रेम असाव ... मी उशिरा का आलो म्हणून रुसाव , मी मग तास न तास तुला मनावाव, आणि मग हळूच तू हसून द्याव , अस माझ प्रेम असाव ... प्रेमाच्या नभा खाली , प्रेमाच्या धर्तीवर , प्रेमात रंगलेलो फक्त दोघे असावेत , अस माझ प्रेम असाव ... तुला उदास बघून , माझे अश्रू पहिले निघावेत , अस माझ प्रेम असाव ... प्रेमाच्या वर्षेत , चीम्भं भिजून , दोघे आनंदात गाणे गावेत , अस माझ प्रेम असाव ... जीवनाच्या प्रत्येक क्षणात , तुझ्या सुखासाठी मी झटाव, अस माझ प्रेम असाव ... आपल्या चहू बाजूनी प्रेम , प्रेम आणि फक्त प्रेमाचा वास असावा , अशी ती नागरी असावी , अस माझ प्रेम असाव ... $uMe$h ***********************************************************