Posts

Showing posts from February, 2010

अस वाटते कुणी तरी असाव ....

अस वाटते कुणी तरी असाव , माझ्या वर खूप प्रेम करणार , माझ्या सोबत जीवन जगणार , माझ्या हसण्यात आनंद बघणार ... अस वाटते कुणी तरी असाव , हक्कानी गोष्टी सांगणार , छोट्या छोट्या गोष्टीत रुसणार , माझ्या अश्रूंची परिभाषा समजणार ... अस वाटते कुणी तरी असाव , गर्दीतूनही मला ओळखणार , कोण्याही परीस्थित हात न सोडणार , स्वताचे स्वप्न माझ्यात बघणार ... अस वाटते कुणी तरी असाव , माझ्या मिठीत सर्व दुख विसरणार , मला बघतच सगळे tension विसरणार , माझ्या जिवनाच अर्थ बनणार ... अस वाटते कुणी तरी असाव , माझी आतुरतेन वाट बघणार , आणि त्या वाटेत हि आनद भोगणार , मी येताच पळत माझ्या मिठीत येणार ... अस वाटते कुणी तरी असाव , माझ्या कवितेचा शब्द बनणार , त्या कवितेचा अर्थ समजणार , आणि त्या कवितेने भारावून जाणार ... अस वाटते अस असेल कुणीतरी , कुठेतरी , असच माझ्या सारखा विचार करणारी ... $uMe$h............... *****************************************************************************

माझ प्रेम पत्र ...

आज मनात एक विचार आला, काही तरी लिहायचं म्हणून, पण मग विचार केला काय लिहू आणि कुणासाठी , तेव्हा म्हणात फक्त एकच आठवण होती , तुला सांगू कुणाची , फक्त तुझी आणि तुझीच ... मला माहित नाही हे सगळ वाचून तुला काय वाटणार , पण जे मी यात लिहित आहे , हे शुध्द पाण्याप्रमाणे खर आहे , म्हणून जर तुला यातलं काही चुकूच वाटत असेल तर मला माफ कर ... मी फक्त दोन ओळीत तुझ्या बद्दल काय वाटते ते लिहिणार आहे .... I LOVE YOU, आणि मला प्रेम काय असते , हे चांगल्या तर्हेने माहित आहे ... मी तुझ्या शिवाय जगू शकतो पण ते जीवन निरास असेल ... आणि ह एक गोष्ट , मी तुझ्या डोळ्यात कधी अश्रू येवू देणार नाही , माझा विश्वास ठेव .. तुझा आणि फक्त तुझा ... तुला माहित आहे कोण ... I LOVE YOU MY SWEAT HEART...!!! $uMe$h....